
तो एक आहे की अनेक आहे तो सर्वस्व आहे की शून्यत्व आहे तो वास्तव आहे की संभ्रम आहे तो स्पष्ट आहे की धूसर आहे तो कुणीकडे नाही आणि कुणीकडे आहे तो कुठेच नाही की सगळीकडे आहे तो तुमच्यात आहे की माझ्यात आहे तो सत्यात आहे की मिथ्यात आहे तो शरीरात आहे की मनात आहे तो कल्पित आहे की अकल्पित आहे तो वासना आहे की विरक्ती आहे तो आशा आहे की नैराश्य आहे तो प्रकाशात आहे की अंधारात आहे तो रात्रीत आहे की दिवसात आहे तो लांबी आहे की रुंदी आहे तो तपस्विता आहे की धुंदी आहे तो तर्क्य आहे की अतर्क्य आहे तो शक्य आहे की अशक्य आहे तो पाश आहे की मुक्ती आहे तो भीती आहे की शक्ती आहे तो दृश्य आहे की अदृश्य आहे तो स्पृश्य आहे की अस्पृश्य आहे तो चर आहे की अचर आहे तो प्रश्न आहे की उत्तर आहे समजा तो हत्ती, आणि आपण सारे आंधळे चाचपतोय त्याची सोंड, शेपूट अन् पाय समजा ह्यातलं काहीच जर तो नसेल तर मग सांगा, आता करायचं काय?