लाॅकडाऊन लेबरर

अरे उठलास का?
दात घासलेस का?

चहा ठेवलास का?
माझा ओतलास का?

कचरा ठेवलास का?
डबे आणलेस का?

आंघोळ केलीस का?
कपडे धुतलेस का?

वाळत घातलेस का?
काढून आणलेस का?

भाजी आणलीस का?
स्वयंपाक केलास का?

पाटपाणी घेतलंस का?
ताटं वाढलीस का?

भांडी घासलीस का?
ओटा पुसलास का?

दिवे लावलेस का?
दिवे मालवलेस का?

गाद्या घातल्यास का?
दारं लावलीस का?

दात घासलेस का?
इतक्यात झोपलास का?

***

आधी आणि नंतर

लग्नाआधी तिने त्याचं हृदय पळवून नेलं
लग्नानंतर ती म्हणे “मेलं लग्न का केलं?”

लग्नाआधी तो तिचा ‘हीरो नंबर वन’
लग्नानंतर तो झाला ‘आॅब्जेक्ट आॅफ फन’

लग्नाआधी टापटीप तिची त्याला भावे
लग्नानंतर ठेवू लागली ती त्याला नावे

लग्नाआधी तिच्याविना जागवली रात
लग्नानंतर ती घोरते, त्याचे कानावर हात

लग्नाआधी प्राजक्ताचा रोज सडा पडे
लग्नानंतर ढालीला रोज तलवार भिडे

लग्नाआधी ती हसल्यावर फुले सांडायची
लग्नानंतर ती हसली की दोघे भांडायची

लग्नाआधी लोक म्हणत “लक्ष्मीनारायण जोडा”
लग्नानंतर “खूप झालं - ह्यांचं लग्न मोडा!”