आम्ही पुण्यात जिथे राहतो तिथे पूर्वी शेतं होती ऊसांचे दाट फड होते रात्री भुतंखेतं होती शेती जाऊन वर्षे झाली आता आले हाय राईझ मजल्यांवरती चढले मजले हरेक फ्लॅट किंग साईझ शेतकऱ्यांनी पैसे केले इथून आले तिथून गेले छोटे शून्य मोठे शून्य एक फेके दुसरा झेले झोपडीत म्हातारा निजतो तेल संपतं, पणती विझते माॅल मध्ये धाकटी नात मार्बलच्या फरश्या पुसते