दूर

माझी व्यथा समजून घे  । हे क्लेश तू साहू नको
पण लक्ष दे माझ्याकडे । दूर तू पाहू  नको 

जाहल्या जखमा जरी । मलमपट्टी मज नको
फक्त निजण्या बाज दे । दूर तू पाहू  नको 

होउनी भयभीतशी । पाहशी का मजकडे
अस्वस्थ आणिक भ्रांत मी । दूर तू पाहू  नको 

केलि मी पापे जरी । तव क्षमा मजला नको
एक पांथिक श्रांत मी । दूर तू पाहू  नको 

मीच केवळ ना बळी । दिसती मला तव यातना
चल मिळुन भोगू तयां। दूर तू पाहू  नको 

जिंकीन मी हा सामना । जर खेळशिल माझ्यासवे
ये हात हाती घे जरा । दूर तू पाहू  नको 

दिवस येतिल चांगले । हे तू मला सांगू नको
घे मला जवळी तुझ्या ।  दूर तू पाहू नको 

2 thoughts on “दूर

 1. Bhal Shrikhande March 16, 2021 / 3:35 am

  वाह वा, फक्त “तू” हवी आहेस, त्याव्यतिरिक्त काहीही नको ही तीव्र भावना कवितेतून छान शब्दांत व्यक्त झाली आहे.

  एक हिंदी गाणं आठवलं
  ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रख्खा क्या है ।

  Like

 2. BYJ March 17, 2021 / 12:55 pm

  छान आहे, आर्ततेने दिलेल्या हाकेकडे लक्ष दे, बस साथ दे मग निश्चितच दिवस येतील चांगले…..!

  सुंदर रचना….!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s