
हे अशक्य आहे – अहंकार म्हणाला
तू अपयशी होशील, आणि मग
मी दुखावला जाईन
खरं आहे – मी म्हणालो
पण अनुभव काय सांगतोय
ते तरी ऐकूया
हे जोखिमेचं आहे – अनुभव म्हणाला
कदाचित तुला यश मिळेलही
पण खात्री देता येणार नाही
ठीक आहे – मी म्हणालो
पण प्रज्ञा काय म्हणतेय
ते जरा पाहूया
हे अर्थहीन आहे – प्रज्ञा म्हणाली
केवळ तुझी ईर्षा आहे म्हणून
तू काहीही करशील का?
बरं आहे – मी म्हणालो
पण हृदय काय सांगेल
तेच आपण करूया
जरूर प्रयत्न कर – हृदय म्हणालं
हे अशक्य असेल, जोखिमेचं असेल
कदाचित अर्थहीनही असेल…
पण प्रयत्न केलास तरच तुला कळेल
आणि जर प्रयत्नच करणार नसशील
तर मग तुला माझा काय उपयोग?
खरं आहे. सगळ्यात जास्त प्रयत्न केले पाहिजेत हेच खरं. 👌
LikeLike
Nice…..
‘दिलकी सुनो’ म्हणतात ते शब्दात आणलेस.
ह्रदयाची स्पंदन आहेत तोवरच अहंकार, अनुभव आहेत so दिलकि सुनो अन्यथा सर्व आयुष्य निरसच…..!
Really Beautiful….
LikeLiked by 1 person
धन्यवाद बलवंत!
LikeLike