
असा कसा तू माणूस | डोळे असून आंधळा
हात असून दुर्बळ | पाय असून पांगळा
असा कसा तू माणूस | सुखे भोगून दुखला
म्हणे माझे नाही कोणी | आप्त असून एकला
असा कसा तू माणूस | राजवाड्यात बेघर
सुखी खाऊनपिऊन | परी दुखणी दुर्धर
असा कसा तू माणूस | पैका असून गरिबी
जग लेवून पायाशी | म्हणशी मी कमनशिबी
असा कसा तू माणूस | शाळा शिकून अज्ञान
मोठा इमानी चाकर | स्वत:शी तू बेइमान
असा कसा तू माणूस | करी अर्थाचा अनर्थ
असे अंगी दैवी शक्ती | तरीही तू असमर्थ
असा कसा तू माणूस | चुकला रे तुझा नेम
तीच खरी माणुसकी | देई इतरां जी प्रेम
ऊठ जाग रे माणसा | डोळे उघड सताड
आत येऊदे उजेड | ऊठ उघड कवाड
वाह वा !! छान विचार!
बहिणाबाई या प्रवृत्तीला “झाला मानसाचा रे कानूस” असं संबोधतात !!😊
LikeLiked by 2 people
A beautiful, empowering message for the world, that is groping its way
through the darkness of anxiety and hopelessness.
Aseem
LikeLiked by 1 person
माणूस या अजब रसायनाच्या कणा कणाचा scan or
X-ray च केलात की राव….!
Very Nice.
LikeLike
धन्यवाद बलवंत!
LikeLiked by 1 person
माणसाच्या प्रवृत्ती तील अंतर्विरोध दाखवून देतानाच त्याला अंतर्मुख करते ही कविता… कमाल आहे… सुंदरच…
LikeLiked by 1 person
धन्यवाद विज़ू!
LikeLike