
पाहतांना मजकडे
माझा मला मी पाहतो
जीवनाच्या दर्पणातुन
स्वत्व मी धुंडाळतो
एकदा जन्मूनही मी
खूप वेळा जन्मलो
प्रेमि मजला हरवुनी मी
विरहि मजला गवसलो
एक जीवन जगुनिया
हे संपले नाही जिणे
वर्षले आभाळ तरिही
उतरली नाहित उन्हे
मरण देखिल एकदा
येउनी भागेल का?
दाह त्या मंत्राग्निचा
माझ्या मना लागेल का?
जोवरी तुझिया मनातुन
मत्स्मृती विरणार नाही
तोवरी मी ह्या जगातुन
संक्रमण करणार नाही
होशील जेव्हा चालती
तू नाव माझे विसरुनी
हा निरामय समयसागर
घेईल मजला शोषुनी
छान आहे. आपलं जाणं कधीच संपत नाही कारण आपण ज्यांना ज्यांना आपल्या जगाचा भाग मानतो त्यांच्या जीवनात आपण आठवणींच्या स्वरूपात जिवंत असतोसच. नाही का?
LikeLike
I have always enjoyed your parallel poems in Marathi and English and have not shied away from providing you my (critical?) feedback. So, here it is
for your recent works.
The English one came first, and I thoroughly enjoyed it (I have already confessed to my bias for English, maybe because I don’t absorb Marathi
nuances as much). The Marathi one came next, and it is literally, the icing on the cake.
And that is because it doesn’t come across as a parallel! The English one is a beautiful elaboration of “a man” from the first line, “I am a man”
The Marathi one – it is about the persistent, refusing to quit kind-of a lover, as in:
जोवरी तुझिया मनातुन
मत्स्मृती विरणार नाही
तोवरी मी ह्या जगातुन
संक्रमण करणार नाही
होशील जेव्हा चालती
तू नाव माझे विसरुनी
हा निरामय समयसागर
घेईल मजला शोषुनी
I think I said it all; very well done!
Aseem
LikeLiked by 1 person
खूप कसदार, matured मांडणी, day by day your poems are scaling new heights .
मी प्रेमात हरवून …विरहात गवसलो…Is really a master stroke….!
LikeLiked by 1 person
Thank you so much Balwant! Discerning readers like you make the effort worthwhile!
LikeLike