(नाज़िश शाह ह्यांच्या एका सुंदर हिंदी कवितेचा अनुवाद. हिंदी कविता खाली प्रतिकृत केली आहे.)

काही बोलू नको
पुरे… आता काहीच बोलू नको
शब्दच आहेत जे दगा देतात
विश्वासघात करतात
अनर्थाचा वर्षाव करतात
शब्दांना राहूदे म्यानातच
नाहीतर तलवारीचा वार होऊन
ते तुला खुनी बनवून टाकतील
शांततेला आत्मसात कर
बोलायचे ते तुझ्या डोळ्यांना बोलू दे
तुला उलगडतील तुझी उल्लंघने
पण आधी हृदयाची धडधड थांबू दे
शेवटी आपण माणसे
आपला संताप तेवढा योग्य
इतरांच्या यातना हा दुराग्रह
कृत्रिम बतावणी ठरवून
ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात
उभे केले जाते विनाकारण
संतापाला शब्दरूप देऊ नको
येणाऱ्या लाटेला फुटू देऊ नको
संयमाचा कारावास तुझ्या नशिबी
अहंकाराचा प्याला घोटाघोटाने पी
तुझ्याकडे मागीन तसाच मीही वागीन
पण तूही थोडा वेळ विचार कर
काही बोलू नको
काही बोलू नको
पुरे… आता काहीच बोलू नको
***
कुछ ना कहो
कुछ ना कहो
बस, अब कुछ भी ना कहो
लफ़्ज़ ही हैं जो दग़ा देते हैं
बेवफा बनकर
कहर बरसते हैं
लफ़्ज़ को मयान में रहने दो
तलवार सा वार करके
तुम्हें क़ातिल करार देते हैं
ख़ामोशी इख़्तियार करलो
आँखों को ही बोलने दो
गलती का एहसास है लाज़िम
मगर धड़कन को संभलने दो
हैं तो हम महज़ इन्सान
ख़ुद की अझीयत है बजा
दूसरे का दर्द है ज़िद
एक बनावटी सा बहाना
जो कठगरे में खडा कर
बेवजह ही इल्ज़ाम दे
गुस्से को लफ़्ज़ का इज़हार ना दो
लहर उठतेही क़ाबू कर लो
असीर-ए-ज़ब्त ही ग़र है तकदीर
तो अना को घूॅंट घूॅंट पी लो
मैं भी अमल पेरा रहूं और
तुम भी दम भर गौर करलो
कुछ ना कहो
कुछ ना कहो
बस, अब कुछ भी ना कहो
***
किती खरं आहे हे. प्रत्येकाने हा विचार केला तर हे जग खूप छान होईल असं मला वाटतं. संयम पाळायला प्रथम मनातले विचार आणि भावना प्रत्येकाला समजायला हव्यात नाही का? तुझं हिंदी कवितेच शब्दांकन खूप छान. 👍
LikeLiked by 1 person
धन्यवाद समीर!
LikeLike
Not to spoil the relations and world around by ego and anger – wha above message,
really good translation and great selection to translate.
LikeLike