
तात्पर्य

सतावी मनाला । भौतिक हव्यास प्रगतीचा ध्यास । म्हणू तया हिऱ्या माणकांची । बांधू पुरचुंडी त्यांनी भरू खंडी । प्रलोभाची दोनही हातांनी । केले धन गोळा फेकला पाचोळा । चिरीमिरी धनाने मनाचे । केले समाधान विसरलो भान । कैफामध्ये नक्षत्र चमक । सोने आणि चांदी उतरेना धुंदी । वैभवाची आयुष्य प्रवासी । दिसली माणसे लक्ष मी फारसे । नाही दिले सखे सोयरेही । सारखे सभोती नाती अन गोती । हवी कोणा नको जवळिक । मना भय वाटे सारे हे भामटे । हावरट एकला चाललो । आयुष्याची वाट नको भेट गाठ । कोणाचीच आज अचानक । भेटले प्रारब्ध थांबलो मी स्तब्ध । थिजूनिया आपल्याचि डोळां । पाहिले मरण गेलो त्या शरण । कफल्लक
ही माझी कविता इथे अन् आता जन्म घेतेय कोण जाणे कुठल्या विश्वात ही संपेल? ही माझी कविता आहे अपार अथांग आहे अमर्याद अनादि अनंत ही माझी कविता नाही सुखदायक दुःखहारक नाही क्लेशशामक शोकविदारक ही माझी कविता नाही कोमट उदासीन शिळी वरणवाटी ही आहे उसळत्या उकळत्या लाव्हाची रसरसती मूस ही माझी कविता आहे लखलखत्या सत्याची प्रदीप्त उल्का ही कोरडे करून टाकील सारे मिथ्याचे सागर ही माझी कविता नाही एखाद्या विझत्या ताऱ्याचा अशक्त उजेड ही आहे शंभर सूर्यांच्या भडकत्या विस्फोटाची अग्निशिखा ही माझी कविता नाही कोणा एकट्या शोषिताची असहाय आरोळी हे आहे आम्हां सर्वांनी मिळून तुम्हांला दिलेलं आव्हान…