तिची माझी ओळख नव्हती
ती मला परकी होती
पण तरीही माझ्या मनात
तिची सुंदर मूर्ती होती
मग आम्ही प्रेमात पडलो
आम्ही की मी? कोण जाणे
तिच्या मूर्तीला पूजिले मी
जणू देवीच्या मूर्तीप्रमाणे
हळूहळू ओळख वाढत गेली
तिचे गुणदोष कळू लागले
माझ्या मनातल्या मूर्तीला
हळूहळू तडे पडू लागले
आणि एके दिवशी ती
माझ्याशी भांडून निघून गेली
माझ्या मनातल्या मूर्तीला
ती निर्दयपणे भंगून गेली
त्या दिवशी मला कळले
ती मूर्ती केवळ माया होती
माझ्या मनावर पडलेली
ती केवळ तिची छाया होती
कोणास ठाऊक, तिच्या मनात
तिनेही मला घडविले असेल
तिनेही माझ्या प्रतिमेला
चबुतऱ्यावर चढविले असेल
लागेबांधे बांधता बांधता
आपण सारेच शिल्पकार होतो
आपल्या, परक्या, सगळ्यांना
कृत्रिम प्रतिमांची रूपे देतो
कधी आपल्या स्वत्वाचीही
मूर्ती आपल्या मनाला मोहते
आपले आपल्याला कळत नाही
जग आपल्यात काय पाहते
खूप छान. हे सत्य आहे. जेवढं लवकर हे माणसाला समजतं तेवढं अपेक्षा आणि आयुष्य जगणं सोपं जातं.
LikeLiked by 1 person
Thanks Sameer! A conversation with Kalpana about relationships, past and present, became the inspiration for this poem. The credit goes to her!
LikeLike
चबुतरयावर प्रतिमा…..गुण दोष कळण्याआधी की नंतर…….?
LikeLiked by 1 person
That is a great question Balwant! 😀
LikeLike