काही न बोलताही
मी बोलतोच आहे
जडशीळ शांततेला
मी तोलतोच आहे
धरिला जरी अबोला
मन शांत होत नाही
कल्लोळ भावनांचा
हृदयात होत राही
पडता मिटून डोळे
जल्लोष थंड होतो
निस्संग शांततेचे
मी पांघरूण घेतो
निःशब्द शांततेचे
अंगाइगीत होते
कोलाहलात साऱ्या
हलकेच झोप येते
ह्या शब्दहीन पाशी
निजतो खुशीत मीही
परतून बाल होतो
तिचिया कुशीत मीही
कधि शांतता जिवाला
दचकून चाळवीते
कधि थांबल्या स्वरांची
होती सुरेल गीते
त्या स्तब्ध शांततेला
झोपेत जाग आली
स्वप्ने पुन्हा मनीची
सारी सचेत झाली
ही शांतताच आता
आहे मला किनारा
आक्रन्दनी जगाच्या
मिळतो तिचा सहारा
Hi, I can’t read mararhi much but My wife is Marathi. I will let her read , I hope she likes it.
LikeLiked by 1 person
खूप छान. तुझ्या मनात विचार आणि भावनांचा खेल खूप पूर्वी पासून चालत असल्यासारखं वाटलं.
LikeLiked by 1 person
Brutal honesty, beautifully rendered!
त्या स्तब्ध शांततेला
झोपेत जाग आली
स्वप्ने पुन्हा मनीची
सारी सचेत झाली
Wow, this is haunting!
LikeLiked by 1 person
Marvellous Satyen. सूरेश भट आठवले……
LikeLiked by 1 person
That is very high praise Balwant, especially coming from a true रसिक like you! Thank you!
LikeLike