मी न जाणे मज स्वतःला
मी तुला जाणू कसा
कोण तू कळलीस मजला
आव मी आणू कसा
लोलकातुन रंग दिसती
इंद्रधनुचे सातही
भावनांचे रंग तैसे
आपुल्या विश्वातही
राग केव्हा लोभ केव्हा
आणि केव्हा वासना
खंत केव्हा, खेद आणिक
भंगणाऱ्या यातना
अनुभवातुन काय शिकलो
काय गाठी बांधले
तेच तुकडे भौतिकाचे
तोडले अन् सांधले
कालचा मी आज नाही
रोजचा मी वेगळा
आजला मी दूरदर्शी
तर उद्याला आंधळा
आरसा ठेवून पुढती
कधि उभा मी राहतो
पण मला ठाऊक नाही
मी कुणाला पाहतो
कोण मी अन् कोण तू
ह्या क्षणभराच्या ओळखी
पाखरे, होतील उडतां
एकमेकां पारखी
खूप छान आहे सत्येन. तुझ्या भावना शब्दात छान वर्णन केलेल्या आहेत. मस्त!
LikeLike
धन्यवाद समीर!
LikeLike
Sundar Kavita 😍👌👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद!
LikeLiked by 1 person
खूप छान सशक्त रचना.
आशयगर्भ पण तरीही सहजतेने सांगितलेले तत्वज्ञान.
LikeLiked by 1 person
Beautiful…
LikeLiked by 1 person
Thank you!
LikeLike