रात्र इतकी काळोखी
की काहीच दिसत नाहीय
चाचपल्याविना स्वत:चा
चेहराही ओळखू येत नाहीय
बसलोय डोळे विस्फारून
या किर्र घनदाट रानात
नैराश्याला दूर ठेवण्याची
आकांक्षा घेऊन मनात
दाही दिशा न्याहाळतोय
आशेने - कोणीतरी दिसेल
पण इतक्या काळोख्या रात्री
कोण या ठिकाणी असेल?
अचानक मला ऐकू येतेय
झाडपानांची झिळमिळ
कावळा? चिमणी? राघू?
अरेच्या, हा तर कोकीळ!
कुहू, कुहू, तो गातोय
कोणासाठी कोण जाणे
प्रेमिकेचा पत्ता नाही
मग कोणासाठी हे गाणे?
अचानक माझ्या लक्षात आलं
तो केवळ स्वतःसाठी गातोय
आपल्या गाण्याचा सारा आनंद
तो केवळ स्वतःला देतोय
तेव्हा मला कळून चुकलं
एकांतातही सुख मिळतं
आपलं गाणं आपणच ऐकून
आपल्याला बरंच काही कळतं
Like this:
Like Loading...
Related
khoop chhaan!!
LikeLike