कापून टाकाल माझी जीभ?
कापा, पण तरीही माझ्या जळत्या जिवाचं हे गीत
दशदिशांत गुंजत राहील
कापून टाकाल माझे हात?
कापा, पण तरीही माझ्या थोट्या हातांचे हे खुंट
आभाळाला भिडत राहतील
कापून टाकाल माझे पाय?
कापा, पण तरीही माझ्या क्रांतिकारी आत्म्याची ही पावलं
निरंतर चालत राहतील
काढून घ्याल माझे हक्क?
घ्या, पण तरीही माझं हे आंदोलन थांबणार नाही
ते सुरूच राहील
जनावर बनवाल मला?
बनवा, पण म्हणून मी हे सारं मुकाट्यानं
सहन करणार नाही
पिंजऱ्यात डांबाल मला?
डांबा, पण माझ्या संतापाचा अग्नी तुम्हाला जाळल्याविणा
शमणार नाही
अमानुष म्हणाल मला?
म्हणा, पण त्यानं तुमची माणुसकी कधीच
शाबीत होणार नाही
संशयाची बीजं पेराल?
पेरा, पण म्हणून सत्याला फुटलेली पालवी
कोमेजणार नाही
Like this:
Like Loading...
Related