व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली करू नका रे मनमानी एखाद्याचं राजकारण पटलं नाही म्हणून त्याच्या चारित्र्याची का बरं हानी? द्वेष पसरवणारे सैतान बसले आहेत टाकून गळ त्यांचं लक्ष्य एकच आहे तुमच्या मनातली तळमळ त्यांची शिकार बनू नका नका गिळू त्यांचं आमिष तुमचा जीव घेऊन उरेल इतकं जहाल आहे ते विष काही पसरवायचंच असेल तर या अफवांचा नाद सोडा पसरवा प्रेम आणि सामंजस्य माणसाला माणूस जोडा