शब्द म्हणजे सोन्याची खाण शब्द म्हणजे जहरीला बाण शब्द म्हणजे मोत्यांची लड शब्द म्हणजे पापणीची फडफड शब्द म्हणजे प्रेमाचा पान्हा शब्द म्हणजे निजलेला तान्हा शब्द म्हणजे प्रणयाचा रंग शब्द म्हणजे प्रियेचा संग शब्द म्हणजे भावनेचा सूर शब्द आणे जवळ, शब्द नेई दूर शब्द म्हणजे तांडवाचा ताल शब्द म्हणजे लंगडीची चाल शब्द म्हणजे पणतीची वात शब्द म्हणजे खंजिराची पात शब्द नको विखरू इकडे अन् तिकडे नको करू शब्दांनी काळजाचे तुकडे