आजकाल मी हरवलेला असतो जगाला मी दिसतो पण मी माझ्याच विश्वात वसतो जिथे नसतो रोजचा संघर्ष नसते कायमची निराशा नसतात अपूर्तीच्या यातना जिथे कधीच अंधार होत नाही सारे दिवे पेटते राहतात सगळे रस्ते स्वच्छ दिसतात जिथे नसतो स्वप्न आणि सत्यात फरक दोन्ही डोळे लोलक बनतात आणि दृश्यांची इंद्रधनुष्यं होतात जिथे मी जागेपणी निजतो आणि झोपेतही जागा असतो जिथे प्राण गमावूनही मी जिवंत असतो