घाव, रक्त, लचके, तुकडे विखरून टाका इकडे तिकडे द्वेष, वीर्य, विष, विषय आता राहिला तेवढाच आशय इतकं का आपलं आयुष्य बीभत्स झालं आहे? की सौंदर्य, कौमल्य, मार्दव सगळं मरून गेलंआहे? अजूनही तोच सूर्योदय जगाला उजळून टाकतो ना? अजूनही तोच वळीवपाउूस जमिनीची तगमग झाकतो ना? आपल्या गरजा झाल्यात भौतिक निसर्गाचं कसलं मेलं कौतिक? कुरूप, विकृत, तेवढंच आता विकतं सुंदर, सुरूप काय, भाराभर पिकतं!